
समर्थ जोशी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एसआर व्हेंचर्स संघाने युवराज क्रिकेट अकादमी संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या लढतीत समर्थ जोशी हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. युवराज क्रिकेट अकादमीने १५ षटकात आठ बाद ८० धावा काढल्या. एसआर व्हेंचर्स संघाने १०.१ षटकात एक बाद ८१ धावा फटकावत नऊ विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात समर्थ जोशी याने ३३ चेंडूत ४८ धावांची जलद खेळी केली. त्याने नऊ चौकार मारले. राजवीर परदेशी याने ३४ चेंडूत दोन चौकारांसह ३३ धावा फटकावल्या. सदगुरू रेड्डी याने २१ चेंडूत १७ धावा काढल्या.
गोलंदाजीत सुयोग घनवट याने (२-१२), श्रीतेज नागरे (१-९), चिन्मय श्रीवास्तव (१-१८) यांनी अचूक मारा करत विकेट घेतल्या.