धर्मशाला क्रिकेट स्टेडियमवर ब्लॅकआऊट, पंजाब-दिल्ली सामना रद्द

  • By admin
  • May 8, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

धर्मशाळा : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी कारवाईमुळे धर्मशाळेत खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना थांबवण्यात आला आणि नंतर रद्द करण्यात आला. दुसरीकडे भारताच्या प्रत्युत्तरात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त केले. त्यामुळे पीएसएल स्पर्धेतील सामना रद्द करण्यात आला.

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल स्पर्धेतील ५८वा सामना सुरू होता. गुरुवारी रात्री ९.२९ वाजेच्या सुमारास भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार लष्करी कारवाई सुरू झाली. द्रोण, मिसाइलचा वापर होत असल्याने अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आला. धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर सामना फ्लड लाईट्स मध्ये सुरू होता. ब्लॅकआऊट करण्यात आल्यामुळे पंजाब व दिल्ली यांच्यातील सामना १०.१ षटकानंतर थांबवण्यात आला. त्यावेळी पंजाब किंग्ज संघ एक बाद १२२ अशा भक्कम स्थितीत होता. पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १०.१ षटकात एक बाद १२२ धावसंख्या उभारली. टी नटराजन याने ४ धावांत एक विकेट घेतली.

पंजाब संघाच्या डावाची सुरुवात आक्रमक झाली. प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग या सलामी जोडीने १२२ धावांची भागीदारी केली. प्रियांश आर्य अवघ्या ३४ चेंडूत ७० धावा काढून बाद झाला. त्याने सहा टोलेजंग षटकार व पाच चौकार मारले. प्रभसिमरन सिंग याने २८ चेंडूत नाबाद ५० धावा काढल्या आहेत. त्याने सात चौकार मारले. कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात उतरताच अचानाक ब्लॅकआऊट करण्यात आले. त्यानंतर सर्व खेळाडू मैदानाबाहेर गेले.

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त
पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत गुरुवारी ड्रोन हल्ला केला ज्यामध्ये रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रावळपिंडी येथे होणारा पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला आहे आणि कोणत्याही नवीन तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही याची पुष्टी केली आहे. आता पीएसएलवरही धोका निर्माण झाला आहे. भारताच्या कारवाईच्या भीतीने पीसीबीने गुरुवारी आपत्कालीन बैठकही घेतली.

पीएसएल बाबत निर्णय घेण्यासाठी पीसीबीने बोलावली आपत्कालीन बैठक
भारतीय लष्कराच्या हल्ल्यांमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) थांबवण्याबाबत चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे कारण त्यात अनेक परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. रावळपिंडी येथे होणाऱ्या या टी २० लीगमध्ये सहा फ्रँचायझींचा समावेश आहे आणि ती अंतिम टप्प्यात आहे. १८ मे रोजी लाहोरमध्ये या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *