
जळगाव ः जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे पंधरा वर्षांखालील मुलींसाठी निवड चाचणीचे आयोजन १० मे रोजी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या निमंत्रितांच्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याची निवड चाचणी शनिवारी (१० मे) सकाळी ८.३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे मैदान, विद्या इंग्लिश स्कूल मागे, डी मार्ट जवळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणीत ज्या मुलींचा जन्म दिनांक १/९/२०१० ते ३१/८/२०१३ दरम्यान झाला आहे त्याच मुली या निवड चाचणीसाठी पात्र असतील. अशा पात्र मुलींनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात व क्रिकेट किटसह मैदानावर उपस्थित रहावे असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांनी केले आहे.