
पुमसे प्रकारात विजेतेपद, क्युरोगी प्रकारात तृतीय क्रमांक
मुंबई ः बदलापूर येथे झालेल्या ओपन जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एक्सलंट तायक्वांदो अकादमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत ६४ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत एक्सलंट अकादमीच्या खेळाडूंनी पुमसे प्रकारात विजेतेपद पटकावले तसेच क्युरोगी प्रकारात तृतीय क्रमांक संपादन केला.
बाळासाहेब म्हात्रे महाविद्यालय बदलापूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ओपन जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये ३०० हुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये एक्सलंट तायक्वांदो अकॅडमी मिरा रोड ठाणे शाखेचे ५० खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा ठाणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व सुरज तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा फ्रेशर व रेग्युलर अशा दोन गटांमध्ये भरवण्यात आली होती. ८ वर्षांखालील, १० वर्षांखालील, १२ वर्षांखालील मुला-मुलींची स्पर्धा ईएसएस व १४ वर्षांखालील व १७ वर्षांखालील मुला-मुलींची स्पर्धा पीएसएस सेन्सॉर सिस्टिमद्वारे घेण्यात आली.
या स्पर्धेत खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली. सर्व खेळाडू राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा भाईंदर येथे प्रशिक्षण घेत आहेत. संघा सोबत राष्ट्रीय प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांनी संघ प्रशिक्षक म्हणून होते तर संघ व्यवस्थापक म्हणून मंथन वापीलकर यांनी काम पाहिले.
विजेत्या स्पर्धकांचे तसेच प्रशिक्षकांचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खास अभिनंदन केले आहे. तसेच विभाग प्रमुख सचिन मांजरेकर, जिल्हा संघटक निशा नार्वेकर, मधुसूदन सुर्वे, एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक नीरज बोरसे, राष्ट्रीय प्रशिक्षक लता कलवार तसेच ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलील जवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळे, प्रमोद कदम यांनी पदक विजेत्यांचे कौतुक केले आहे.
पदक विजेते खेळाडू
क्युरोगी सुवर्णपदक ः समृद्धी जाधव, पियुशा जैन, अन्विता सावंत, आर्या तिवारी, युक्ती जंगम, सावी खोपकर, लेखा आगेडकर, श्री चव्हाण, जान्हवी जंगम, स्वरा मोहिते, अमृता कुलकर्णी, अद्विक अग्रवाल, प्रणिल नादावडेकर, आदित्य सुरेंद्रन, हार्दिक आर्या.
रौप्य पदक ः विभा अग्रवाल, ऋषिकेश कुलकर्णी, शौर्य गणवीर, विदिशा करवा, प्रणिल दीक्षित, शिवन्या मेन्डाॅन, शौर्य धुरी, शिविक माणुसमारे, र्विषा बारगोडे, युवराज सिंग, दिवित पुजारी, क्षितिजा पाटील, गुणमय चनाल, मंथन रावत, अनिकेत कुलकर्णी, श्लोक नेगी, आधवान लाहोटी.
कांस्यपदक ः राघवेंद्र कुलकर्णी, माही व्हले, पार्थ आगेडकर, समर्थ त्रिपाठी, विक्रांत पांडे, प्रणय चनाल, देवांश रावत, अनन्या गोरे, मोनिका तिरुवा, खुशी तिवारी, पूर्ती जैन, क्षितिजा नादावडेकर, प्रिशा शुक्ला.
पुमसे सुवर्णपदक ः समृद्धी जाधव, अन्विता सावंत, पियुषा जैन, पूर्ती जैन, जान्हवी जंगम, तनिष्का पानंदीकर, विवान माने.
रौप्य पदक ः श्रुतीप्रज्ञान साहू, क्षितिजा नादावडेकर, क्षितिजा पाटील, अनिकेत कुलकर्णी, अमृता कुलकर्णी, विदिशा करवा, लेखा आगेडकर, पार्थ आगेडकर, विभा अग्रवाल, आदित्य सुरेंद्रन.
कांस्यपदक ः प्रणिल नादावडेकर, स्वरा मोहिते.