
जळगाव ः मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या फुटबॉल संघाने सर्वाधिक गोल करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीगचा पहिला सामना बांद्रा नवेल डिसूजा ग्राऊंडवर झाला. संपूर्ण स्पर्धेत कॉर्पोरेट जगतातील १६ संघांनी सहभाग घेतला. ‘ए’ व ‘बी’ गृप मध्ये ही स्पर्धा होत आहे. यात जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीचा फुटबॉल संघ पहिल्यांदा सहभागी झाला. जैन इरिगेशनचा पहिला सामना नेव्हल डॉकयार्ड सोबत ६ मे रोजी झाला. या सामनामध्ये जैन इरिगेशनने नेव्हल डॉकयार्ड संघाला नमवत ६-० ने सामना जिंकला. यामध्ये गोल फवाझ अहमद पहिला गोल १४ मिनिटांत (पेनल्टी) केला तर त्यानंतर आकाश कांबळे याने १८ व्या मिनिटाला, अरशद शेख याने २९व्या मिनिटाला, मोहम्मद मोईझ याने ४७ व्या मिनिटाला गोल नोंदवले. तसेच अभंग अजित जैन याने ६८ व ७० मिनिटांत असे दोन गोल केले. त्यांना निखिल माळी यांनी सुरेख साथ दिली. धनंजय धनगर व मिशकात जमाल यांनी उत्कृष्ट कामगिरी या सामन्यात केली. संघ प्रशिक्षक म्हणून अब्दुल मोहसिन काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून अरबाज खान, सुरज सपके होते. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अतुल जैन यांच्यासह अरविंद देशपांडे व सहकाऱ्यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
—