
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट – अभिषेक कुचेकर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत सीके स्पोर्ट्स संघाने एएसएफ संघावर तीन विकेट राखून सहज विजय साकारला. या सामन्यात अभिषेक कुचेकर याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. अंडर १४ क्रिकेटपटूंना व्यापक खेळण्याची संधी मिळावी या हेतूने प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रोफेशनल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी सांगितले. या सामन्यात एएसएफ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २५ षटकात नऊ बाद १४७ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सीके स्पोर्ट्स संघाने २१.१ षटकात सात बाद १५१ धावा फटकावत तीन विकेट राखून सहज विजय साकारला.

या सामन्यात झैद खान याने आक्रमक शतक साजरे केले. झैद खान याने अवघ्या ७३ चेंडूंचा सामना करत १०० धावा फटकावल्या. या शतकी खेळीत त्याने १८ चौकार मारले. श्रेयस कुलकर्णी याने ४२ चेंडूत ५४ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने नऊ चौकार मारले. श्रुती सोनार हिने ३० चेंडूत २० धावांचे योगदान दिले. तिने तीन चौकार मारले.
गोलंदाजीत अभिषेक कुचेकर याने अवघ्या १७ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. या शानदार स्पेलमुळे अभिषेक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. काव्या सांगळे हिने २३ धावांत तीन विकेट घेत चमकदार कामगिरी बजावली. नूर सय्यद याने १५ धावांत दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
एएसएफ टीम ः २५ षटकात नऊ बाद १४७ (अविनाश थोरात ७, झैद खान १००, शेख अबुबाकर १०, आदित्य आढाव ११, इतर ११, अभिषेक कुचेकर ५-१७, श्रेयस कुलकर्णी २-२०, अर्शान पठाण १-२५) पराभूत विरुद्ध सीके स्पोर्ट्स टीम ः २१.१ षटकात सात बाद १५१ (मनोज दरक १९, श्रेयस कुलकर्णी ५४, श्रुती सोनार २०, गणेश ९, अर्शान पठाण ८, इतर २९, काव्या सांगळे ३-२३, नूर सय्यद २-१५, शेख अबुबाकर १-४, झैद खान १-२५). सामनावीर ः अभिषेक कुचेकर.