
छत्रपती संभाजीनगर प्रीमियर लीग – साई गुंड सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एसआर व्हेंचर्स संघाने एमई वॉरियर्स संघाचा ५५ धावांनी पराभव करत आगेकूच केली. या लढतीत साई गुंड हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. एमई वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एसआर व्हेंचर्स संघाने २० षटकात चार बाद १५५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. एमई वॉरियर्स संघ २० षटकात सात बाद १०० धावा काढू शकला. एसआर व्हेंचर्स संघाने ५५ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात साई गुंड (५६), समर्थ जोशी (३७), रिदम साहुजी (२०), अंश डी (२-१०), जिशान शेख (२-२८) यांनी चमकदार कामगिरी नोंदवली.
संक्षिप्त धावफलक
एसआर व्हेंचर्स ः २० षटकात चार बाद १५५ (साई गुंड ५६, देवांग ७, अंश ६, समर्थ जोशी नाबाद ३७, चिन्मय श्रीवास्तव नाबाद १६, इतर २९, जिशान शेख २-२८, अर्जुन शेळके १-३१) विजयी विरुद्ध एमई वॉरियर्स ः २० षटकात सात बाद १०० (श्रेया मस्के १३, अर्णव जैस्वाल ११, साईराज बलांडे १८, रिदम साहुजी नाबाद २०, जिशान शेख नाबाद ६, इतर १८, अंश डी २-१०, देवराज १-३, सुमित १-१४). सामनावीर ः साई गुंड.