
छत्रपती संभाजीनगर प्रीमियर लीग – श्लोक जगदाळे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सानिया मोटर्स संघाने युवराज क्रिकेट अकादमी संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात श्लोक जगदाळे याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. युवराज क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना १८.५ षटकात सर्वबाद ११० धावसंख्या उभारली. सानिया मोटर्स संघाने ११ षटकात दोन बाद १११ धावा फटकावत आठ गडी राखून दणदणीत विजय साकारला.

या सामन्यात अमोल कापसे (४०), यज्ञ राजपूत (३७), आरुष राजगुरू (२६) यांनी फलंदाजीत करत गोलंदाजीत श्लोक जगदाळे (३-१०), श्रेणिक दुधेडिया (२-११) व शिवम केवारे (२-२४) यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक
युवराज क्रिकेट अकादमी ः १८.५ षटकात सर्वबाद ११० (व्ही राजपूत ७, राजवीर परदेशी ९, एस एस पाटील १५, आर्यन गोजे १८, अमोल कापसे ४०, श्लोक जगदाळे ३-१०, शिवम केवारे २-२४, श्रेणिक दुधेडिया २-११, हर्षद शिंदे १-१५) पराभूत विरुद्ध सानिया मोटर्स ः ११ षटकात दोन बाद १११ (यज्ञ राजपूत नाबाद ३७, आरुष राजगुरू २६, कार्तिक खरात १४, अर्णव गिरी नाबाद १३, इतर २१, अथर्व मोकाशी १-१६, राजवीर परदेशी १-१५). सामनावीर ः श्लोक जगदाळे.