
छत्रपती संभाजीनगर प्रीमियर लीग ः शतकवीर विरेन डहाळे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती फायटर्स संघाने एमई वॉरियर्स संघाचा ५१ धावांनी पराभव करत आगेकूच केली. या सामन्यात शतकवीर विरेन डहाळे याने सामनावीर पुरस्कार मिळवला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. छत्रपती फायटर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात चार बाद १७४ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात एमई वॉरियर्स संघ २० षटकात नऊ बाद १२३ धावा काढू शकला. छत्रपती फायटर्स संघाने ५१ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात विरेन डहाळे याने तुफानी शतक साजरे केले. त्याने ५६ चेंडूत १४ चौकार व दोन षटकारांसह १०० धावा काढल्या. साईराज बलांडे (६६) व देवव्रत पवार (२४) यांनी सुरेख फलंदाजी केली. देवव्रत पवार (२-१०), वीर यादव (१-१०), साईराज बलांडे (१-८) यांनी अचूक स्पेल टाकला.
संक्षिप्त धावफलक
छत्रपती फायटर्स ः २० षटकात चार बाद १७४ (देवव्रत पवार २५, प्रथमेश चेके १३, विरेन डहाळे नाबाद १००, मयूर सोमासे १०, आयुष गायकवाड १०, साईराज बलांडे १-८, स्वरुप घोडेले १-२४, जिशान शेख १-१३) विजयी विरुद्ध एमई वॉरियर्स ः २० षटकात नऊ बाद १२३ (स्नेहल मगर ६, अर्जुन शेळके १४, साईराज बलांडे ६६, प्रचिती कुलकर्णी १३, श्रेयस लाड नाबाद ७, देवव्रत पवार २-१०, वीर यादव १-१०, दर्शन खेडकर १-२१, आयुष गायकवाड १-२२). सामनावीर ः विरेन डहाळे.