
छत्रपती संभाजीनगर प्रीमियर लीग – विरेन डहाळे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती फायटर्स संघाने युवराज क्रिकेट अकादमी संघाचा चुरशीच्या सामन्यात १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात विरेन डहाळे याने सामनावीर पुरस्कार मिळवला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. छत्रपती फायटर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात आठ बाद १२३ धावसंख्या उभारली. युवराज क्रिकेट अकादमी संघ २० षटकात सात बाद ११० धावा काढू शकला. छत्रपती फायटर्स संघाने १३ धावांनी चुरशीचा विजय मिळवला.
या सामन्यात राजवीर परदेशी (४१), विरेन डहाळे (३१), एस एस पाटील (२१), देवव्रत पवार (२-१४), मयूर सोमासे (२-२२) व सदगुरू रेड्डी (२-११) यांनी प्रभावी कामगिरी नोंदवली.
संक्षिप्त धावफलक
छत्रपती फायटर्स ः २० षटकात आठ बाद १२३ (प्रथमेश चेके ११, रमण १७, विरेन डहाळे ३१, विनय ९, आयुष गायकवाड नाबाद १०, इतर ३१, सदगुरू रेड्डी २-११, भक्ती पाटील १-६, राजवीर परदेशी १-११, आर्यन गोजे १-९, साईराज १-३) विजयी विरुद्ध युवराज क्रिकेट अकादमी ः २० षटकात सात बाद ११० (एस एस पाटील २१, राजवीर परदेशी नाबाद ४१, सदगुरू रेड्डी १३, अथर्व मोकाशी नाबाद १०, देवव्रत पवार २-१४, मयूर सोमासे २-२२, दर्शन खेडकर १-१३, विरेन डहाळे १-२७). सामनावीर ः विरेन डहाळे.