राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रायगडचा संघ घोषित

  • By admin
  • May 10, 2025
  • 0
  • 188 Views
Spread the love

नाशिकमध्ये रविवारपासून रंगणार स्पर्धा

रायगड ः रायगड जिल्हा तायक्वांदो असोसिएशनने नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हास्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेनंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अधिकृत संघ जाहीर केला आहे. ही स्पर्धा ११ ते १३ मे या कालावधीत नाशिक येथील इनडोअर हॉल, विभागीय क्रीडा संकुलात पार पडणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र करीत असून ती इंडिया तायक्वांदो, वर्ल्ड तायक्वांदो आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप ओंबसे (अध्यक्ष), गफ्फार पठाण (सचिव), डॉ प्रसाद कुलकर्णी (कोषाध्यक्ष), तसेच इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

रायगड जिल्हा संघटनेचे सचिन माळी (सचिव), रोहित सिनलकर (कोषाध्यक्ष) आणि प्रतीक गायकवाड (सदस्य) यांचे मार्गदर्शन संघाला लाभणार आहे. तसेच संघ व्यवस्थापक म्हणून उत्कर्ष मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रशिक्षकपदी प्रथम ठोंबरे आणि साईराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याच्या कॅडेट व ज्युनिअर गटातील अधिकृत संघ 

कॅडेट गट मुलींचा संघ
तनिष्का मिलिंद शिरशीवकर (२९ किलो), लावण्या श्रीकांत देशपांडे (३३ किलो), दिशा प्रवीण पाटील (३७ किलो), पूर्वा प्रदीप खारचे (४१ किलो), चार्वी राजेश पेडणेकर (४७ किलो), अवंतिका अजयन नायर (५१ किलो), भार्गवी किरण ठाकूर (५९ किलो), तनिष्का प्रशांत केतकर (फ्रीस्टाइल – वैयक्तिक).

कॅडेट गट मुलांचा संघ
श्लोक सचिन माळी (३३ किलो), हर्षवर्धन जगदीश कदम (३७ किलो), विशाल रमेश राठोड (४१ किलो), आराध्या विद्याधर कदम (४५ किलो), यथार्थ अमोल कदम (४९ किलो),  स्वराज स्वप्नील पाटील (५३ किलो), सैश महेंद्र नाडकर (५७ किलो), क्षितिज दीपक रांधे (६१ किलो), नृपुर संदीप सावंत (६५ किलो).

ज्युनिअर गट मुलींचा संघ
मिरिन मझिद अन्सारी (४२ किलो), ऐश्वर्या रमेश राठोड (५२ किलो).

ज्युनिअर गट मुलांचा संघ
दीप ज्ञानेश्वर कोंडीलकर (४८ किलो), मानस योगेश घरत (६३ किलो), मोहम्मद तमजीद शेख (७८ किलो), साईराज बालाजी भोसिकार (७८ किलो).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *