
पूनम नवगिरे यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर ः पटणा (बिहार) येथे १२ ते १४ मे या कालावधीत होत असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा अॅथलेटिक्स संघ रवाना झाला आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी छत्रपती संभाजीनगरच्या पूनम नवगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अॅथलेटिक्स मुलींच्या संघात श्रेष्ठा शेट्टी, भूमिका नेहाते, कशिष भगत, वैष्णवी गोपनर, प्रणाली मंडले, सुकांता शिवने, जान्हवी हिरूडकर, श्रेया इथापे, मानसी यादव, स्वानंदी सावंत, आंचल पाटील, संतोषी पिंपळसे, शौर्या अंबोरे, मानसी भारेकर, अनुष्का गुट्टे, आर्या मोहिते, नेहाली बोरावाले, ओवी निकम या खेळाडूंचा समावेश आहे. अनुष्का गुट्टे ही छत्रपती संभाजीनगर क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू आहे.
महाराष्ट्राच्या मुलांच्या संघात आदित्य पिसाळ, रुद्र शिंदे, हर्षल जोगे, अभिनंदन सूर्यवंशी, रोहित बिन्नर, श्रेयश जाधव, सैफ चाफेकर, ध्रुव लेवांड, आर्यन सातपुते, आदी पुजारी, खुशाल देवकर, अर्जुन देशपांडे या खेळाडूंचा समावेश आहे.