जलतरणात महाराष्ट्राचा डंका, २९ पदकांसह उपविजेतेपद

  • By admin
  • May 10, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

मुलींच्या विभागात महाराष्ट्र-कर्नाटक संयुक्त विजेते

गया (बिहार) : महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७ सुवर्ण, ७ रौप्य व १५ कांस्य अशी एकूण २९ पदकांची लयलूट सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले. मुलींचा विभागात महाराष्ट्र-कर्नाटक संयुक्त विजेतेपद संपादन केले. एक सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्य अशी एकूण ६ पदके जिंकली.  ४ सुवर्ण १ रौप्‍यांनतर अखेरच्या दिवशी कांस्य यशाने आदिती हेगडे हिने पदकांचा षटकार झळकावला.

बिपार्ड जलतरण तलावावर संपलेल्‍या जलतरणात मुलांच्या विभागात कर्नाटकने १३६ गुणांसह विजेतेपद पटकाविले, तर महाराष्ट्राने ६५ गुणांसह उपविजेतेपद मिळवले. आंध्र प्रदेश संघाने ६४ गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला. मुलींच्या विभागात महाराष्ट्र व कर्नाटक यांनी प्रत्येकी १५६ गुणांची कमाई केली. या गटातील विजेतेपद उभय संघांना विभागून देण्यात आले. तामिळनाडूच्या मुलींनी ६० गुणांसह उपविजेपदाचा मान मिळविला

शनाया शेट्टी हिने ३४.६७ सेकंद वेळेसह महाराष्ट्राला अखेरच्या दिवसातील एकमेव सुवर्णपदक जिंकून दिले. या गटात कर्नाटकची मानवी वर्मा (३५.२३ सेकंद) व तिचीच राज्य सहकारी विहिथा लोगनाथन (३५.४८ सेकंद) या अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या.

मुलांच्या २०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात महाराष्ट्राला दोन पदके मिळाली. धरीती अहिरराव हिने २ मिनिटे ३३.१४ सेकंद वेळेसह रौप्य व निर्मयी आंबेटकर हिने २ मिनिटे २५.२१ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. तामिळनाडूच्या रोशिनी बाळसुब्रमनियन हिने २ मिनिटे २२.९७ सेकंद वेळेसह सुवर्णपदकाची कमाई केली.

मुलींच्या ५० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात श्रीलेखा पारीक (२७.३९ सेकंद) व अल्फेया धनसुरा (२७.४१ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली. कर्नाटकच्या ऋजुला एस हिने २७.१२ सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर नाव कोरले. शिवाय मुलींच्या १५०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या आदिती हेगडे हिने १८ मिनिट २२.९७ सेकंद वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली. आदिती मुळे (१८ मिनिटे ०४.३९) व श्री चरणी तमू (१८ मिनिटे १९.२९ सेकंद) या कर्नाटकच्या जलतरणपटूंनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाला गवसणी घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *