
नागपूर ः नागपूर जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनचे सहसचिव आणि राष्ट्रीय प्रशिक्षक निलेश मते यांची भारतीय महिला व्हॉलिबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
व्हिएतनाम येथे ७ जून २०२५ पासून आयोजित एव्हीसी महिला कप व्हॉलिबॉल स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निलेश मते यांची निवड झाली आहे. व्हॉलिबॉल खेळाला नागपूर शहरात सुरू होऊन जवळपास ५५ वर्ष झाली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुख्य प्रशिक्षक म्हणून निलेश मते यांची निवड झाली. हा व्हॉलिबॉल क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण आहे.
भारतीय व्हॉलिबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे, सचिव संजय नाईक,
सहसचिव निलेश जगताप, उपाध्यक्ष सुनील हांडे, खजिनदार अरविंद गवई, रेफेरी बोर्डाचे चेअरमन पी एस पंत, राष्ट्रीय पंच सौरभ रोकडे, राष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण चिलकुलवार तसेच राज्य असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांनी निलेश मते यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.