विघ्नेश, संग्राम, साद, राजवीर, इंद्रजीत, शिवाजी स्पर्धेतील बेस्ट बॉक्सर

  • By admin
  • May 11, 2025
  • 0
  • 130 Views
Spread the love

पुणे जिल्हा बॉक्सिंग चॅम्पियनशिप 

पुणे ः पुणे जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विघ्नेश नाईक, संग्राम कुंजीर, साद खान, राजवीर गोटे, इंद्रजित रणवरे व शिवाजी चव्हाण या खेळाडूंना स्पर्धेतील बेस्ट बॉक्सर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना व पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर (पुणे) येथे आयोजित पुणे जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कब क्लास (११ वर्षाखालील), कॅडेट (१३ वर्षाखालील), सब ज्युनियर (१५ वर्षाखालील), ज्युनियर (१७ वर्षाखालील), युथ (१९ वर्षाखालील) व एलिट (वरिष्ठ) गटातील मुले अशी विविध गटात घेण्यात आली. 

या स्पर्धेतील विजेत्यांना अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाळ देवांग यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे ॲडमिन डायरेक्टर ब्रिगेडियर मंगेश विटेकर, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे स्पोर्ट्स डायरेक्टर कॅप्टन पद्माकर फड, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी महासचिव भरतकुमार व्हावळ, आंतरराष्ट्रीय पंच कॅप्टन सुरेश कदम, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय कोच विजय गुजर, पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काकडे, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष जीवनलाल निंधाने, पिंपरी चिंचवड बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आणि या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.  

पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव राष्ट्रीय पंच अभिमन्यु सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले व पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटनेचे सचिव विनोद कुंजीर यांनी आभार प्रदर्शन केले.

स्पर्धेतील बेस्ट बॉक्सर

कब क्लास मुले : विघ्नेश धार्मिक (टी जे नाईक अकॅडमी पुणे कॅम्प).कॅडेट मुले : संग्राम कुंजीर (पुरंदर तालुका)सबज्युनिअर मुले : राजवीर गोटे (एसडीबीसी शिरूर)
ज्युनियर मुले : साद खान (स्टार बॉक्सिंग, खडकी)
ज्युनियर मुले : इंद्रजित रणवरे (बीसीए वालचंदनगर)
वरिष्ठ पुरुष : शिवाजी चव्हाण (पुरंदर तालुका)

बेस्ट चॅलेंजर

कब क्लास मुले : समर्थ कांचन (अभिमन्यु अकॅडमी उरुळीकांचन)
कॅडेट मुले : मोहम्मद अली सय्यद (हंस अकॅडमी पुणे कॅम्प)
सबज्युनिअर मुले : अनुकल्प रोडे (मुळशी)
वरिष्ठ पुरुष : हर्षद शिंदे (एसडीबीसी शिरूर)

पदक विजेते खेळाडू 

कब क्लास ः शौर्य हंबीर, स्वराज भड, विराज काळे, समर्थ कांचन, विघ्नेश धार्मिक, रिधन घोसेकर, अद्वैत तांबेकर, आर्यमान कदम, विराट जाधव, मोहम्मद अली सय्यद, साईराज जाधव, हसन शेख, अथर्व मोरे, शुभ चौधरी, ध्रुव लंबाटे, अद्वैत गोसावी. 

कॅडेट क्लास ः विघ्नेश शेंडगे, अनय पाथरीकर, मानव सकपाळ, संग्राम कुंजीर,
विघ्नेश घोरपडे, शिवराज निकम, अथर्व घोलप, सम्यक कांबळे, समर्थ मचाल, समर्थ सांगळे, आदेश वैरागर, स्वराज हरपळे, रुगन उदय, सरफराज हावरी, तन्मय आंबेकर, स्वराज कोळपे, स्वराज खेडकर, आरव जगताप, इयान बंसल.

सब ज्युनियर गट ः आदित्य रामदासी, सोहम लाड, राजवीर गोटे, अनुकल्प रोडे, हुसेन शेख, राजवीर साकोरे, आयुष प्रसाद, गरिबन चौहान, अलकान शेख, सोहम शिंदे, यशराज बडेकर, शुभम कांबळे, हमजा शेख, आयुष काळे, अमनकुमार चौधरी, श्लोक कुंजीर, उदय लोहार, विराज शितोळे, शौर्यन मोहिते, साहिल गायकवाड. 

ज्युनियर गट ः आयुष खराडे, विनय गायकवाड, साद खान, आदित्य चव्हाण, अभय खडे, राहतअली दरवाजकर, अनुज अंबेकर, सर्वेश पवार, बी मृधुराजा, आयुष लोहकरे, उत्कर्ष बडेकर, प्रज्वल आंबेकर, इंद्रजीत रणवरे, साहिल गायकवाड. 
युथ मुले गट ः रेहान शेख, गिरीश शिंदे, अविनाश निषाद, आदित्य शिंदे, शिवाजी चव्हाण, शार्दुल कुंभार, श्रेयस पाटोळे, ज्ञानेश्वर कडीमणी, राजेश गवई, शौर्य सिंग, प्रणव आईवळे, हर्ष भापकर, ऋषिकेश चंडालिया, हर्षद शिंदे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *