
नांदेड ः जी एच रायसोनी मेमोरियल नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिड चेस असोसिएशन, नांदेड, जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन, नागपूर व सक्षम चेस अकॅडमी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या सहकार्याने गणराज बंकेट अँड कॉन्फरन्स हॉल नमस्कार चौक नांदेड येथे १२ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत एकूण रोख रक्कम रुपये ३० हजार रुपये तसेच २७ ट्रॉफी, मेडल व सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. खुल्या गटातील एक ते दहा क्रमांकाचे पारितोषिक. प्रथम ७ हजार रुपये व ट्रॉफी, द्वितीय ४ हजार रुपये व ट्रॉफी, तृतीय ३ हजार रुपये व ट्रॉफी, चतुर्थ २ हजार रुपये, पाचवा १५०० रुपये, सहावा १ हजार रुपये तसेच सातवा ते दहावा ५०० रुपये, विविध वयोगटातील ९, ११, १३, १५, १७ व १९ मुले व मुली यांना प्रथम पारितोषक ५०० रुपये व ट्रॉफी, द्वितीय पारितोषक ३०० रुपये व ट्रॉफी, तीन ते पाच क्रमांक खेळाडूंना मेडल्स देण्यात येतील. स्पर्धा फिडेच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीमध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये आहे. तरी जास्तीत जास्त बुद्धिबळ खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे सचिव डॉ दिनकर हंबर्डे यांनी केले आहे.