
परभणी ः टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व ओडिशा असोसिएशन वतीने २६ वी राष्ट्रीय मिनी युथ टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा पारादीप येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मिनी मुले व मिश्र दुहेरीत सुवर्णपदक तर मिनी मुलींच्या गटात रौप्यपदक पटकावले.
मिनी मुले गटात अंतिम सामना महाराष्ट्र आणि झारखंड दरम्यान झाला. हा सामना महाराष्ट्र संघाने २-० असा जिंकून सुवर्णपदक पटकावले. मिनी मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाचा २-० ने पराभव करत सुवर्णपदक संपादन केले. मिनी मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात झारखंड संघाने महाराष्ट्र संघाचा २-० सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र राज्य संघास स्पोर्ट्स किट, बॅग राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार यांच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्य संघाचे डॉ व्यंकटेश वांगवाड, सुरेशरेड्डी क्यातमवार, गणेश माळवे, अशोक शिंदे, रामेश्वर कोरडे, संजय ठाकरे, डॉ विनय मुन यांनी अभिनंदन केले आहे.
मिनी मुले सुवर्णपदक ः गौरव दिनेश येरावार, वेदांत नागेश म्हमाणे, शिवम सुरेश कदम, दिव्यांशु देवेंद्र चंद (पुणे), अनंत अविनाश धापसे (परभणी), आर्यन सदाशिव उंडे (नाशिक).
मिनी मुली रौप्यपदक ः गायत्री संजय व्यवहारे, श्रद्धा संतोष बोबडे (हिंगोली), राधिका भगवान गायकवाड, वैष्णवी संजय सोनवणे, ईश्वरी मनोहर दळवी, वैष्णवी वाल्मीक शिंदे (नाशिक).
मिनी मिश्र दुहेरी सुवर्णपदक ः सोनाक्षी सुरेश कदम, राजवीर संदीप भोसले (पुणे).
राज्य संघाचे डॉ. व्यंकटेश वांगवाड, सुरेशरेड्डी क्यातमवार, गणेश माळवे, अशोक शिंदे, रामेश्वर कोरडे, संजय ठाकरे, डॉ. विनय मुन यांनी अभिनंदन केले आहे.