
छत्रपती संभाजीनगर ः राजगीर, पटना बिहार येथे सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स संपन्न होत आहेत. फेंसिंग स्पर्धेच्या जुरी ऑफ अपील पदी कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख आणि महाराष्ट्र फेंसिंग असोसिएशनचे सरचिटणीस प्रा उदय डोंगरे यांची निवड झाली असून ते स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.
प्रा उदय डोंगरे यांनी यापूर्वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, नॅशनल गेम्स अशा भारतातील प्रमुख नामांकित स्पर्धांमध्ये ज्युरी ऑफ अपील व तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम केलेले आहे. तसेच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे संघ प्रमुख, भारतीय संघाचे व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून देखील काम केलेले आहे.
प्रा उदय डोंगरे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सतेज पाटील, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानसिंह पवार, सरचिटणीस अशोकराव आहेर, प्राचार्य डॉ विजय भोसले, उपप्राचार्य डॉ भाऊसाहेब मगर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, विद्यापीठाचे क्रीडा विभाग संचालक डॉ संदीप जगताप, गोकुळ तांदळे, जिल्हा संघटनेचे डॉ दिनेश वंजारे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.