
सोलापूर ः पी एस इंग्लिश मीडियम स्कूलच्या सईप्रिया इमड्डशेट्टी व अभिजीत नडगेरी यांची राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूरतर्फे पिलीव (ता. माळशिरस) येथे झालेल्या जिल्हा तायक्वांदो कॅडेट, जुनिअर गटामध्ये क्योरूगी या प्रकारामध्ये स्कूलच्या खेळाडूंनी कामगिरी केली. प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची नाशिक येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना प्रशिक्षक सोमनाथ मगर, क्रीडा शिक्षक अजित पाटील व रोहन घाडगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे श्राविका संस्थेचे सचिव यतीन शहा, विश्वस्त देवई शहा, विश्वस्त करण शहा, मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, पर्यवेक्षक जयेश शिरढोणे यांनी अभिनंदन केले.
जिल्हा स्पर्धेत यशस्वी कामगिरी केलेले खेळाडू : कॅडेट गट : सईप्रिया इमड्डशेट्टी (३७ किलो वजनी गट, प्रथम). ज्युनियर गट : श्रद्धा इमड्डशेट्टी (४९ किलो, तृतीय).
मुले कॅडेट गट : गौरव गावडे (३३ किलो, द्वितीय), अभिजीत नडगेरी (४१ किलो, प्रथम). ज्युनियर गट : मनीष माने (५५ किलो, द्वितीय).