
जालना ः जालना रग्बी असोसिएशनतर्फे १७ मे रोजी जालना जिल्हा रग्बी संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. निवड चाचणी परतूर आणि सोपोरा येथे घेण्यात येणार आहे.
रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य अंडर-१९ रग्बी ७ एस स्पर्धेचे (मुले व मुली) आयोजन श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पुणे येथे २९ व ३० मे रोजी करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी रग्बी असोसिएशन जालना यांचा जिल्हा संघ निवडण्याकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन १७ मे रोजी सकाळी ७ वाजता परतूर/मंठा येथील खेळाडूंसाठी जिल्हा परिषद प्रशाला मैदान परतूर व ज्ञानसागर विद्यालय सोपोरा अंभोरा, ता जाफ्राबाद जि जालना येथे करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त रग्बी खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन रग्बी असोसिएशन जालनाचे अध्यक्ष कपिल आकात, सचिव विकास काळे, प्रमोद खरात, एकनाथ सुरुशे, सोपान शिंदे, संदीप सानप, विजय चव्हाण, राजेश शेवाळे, नागेश वराडे, जावेद पठाण, विवेक जईद यांच्यावतीने करण्यात येत आहे.
या निवड चाचणीत सहभागी होणाऱया खेळाडूचा खेळाडूचा जन्म २००६, २००७ किंवा २००८ मध्ये झालेला असावा. २००९ साली जन्मलेल्यांना विशेष परवानगीने सहभागी होता येईल. आधार कार्ड / जन्म दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. खेळाडूंची कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख २० मे आहे. अधिक माहितीसाठी विकास काळे (7350590072), एकनाथ सुरूशे (9011854192), नंदकिशोर गायके (8668501765) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.