
प्रदीप स्पोर्ट्स अँड प्रोफेशनल क्रिकेट अकादमी९९ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः प्रदीप स्पोर्ट्स अँड प्रोफेशनल क्रिकेट अकादमी९९ यांच्या संयुक्त विद्यमाने फ्युचर चॅम्प अंडर १२ टी २० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २० मे ते ५ जून या कालावधीत रंगणार आहे.

प्रदीप स्पोर्ट्सचे मुख्य संचालक प्रदीप जगदाळे आणि प्रोफेशनल क्रिकेट अकादमी९९चे मुख्य संचालक आदित्य नाईक यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना प्रदीप जगदाळे म्हणाले की, फ्युचर चॅम्प अंडर १२ क्रिकेट स्पर्धा ही युवा क्रिकेटपटूंसाठी एक दर्जेदार व्यासपीठ असेल. या स्पर्धेत एकूण १० संघांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघाला नऊ साखळी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आपले कौशल्य दाखवण्याची संधी या स्पर्धेत मिळणार आहे. रंगीत गणवेश, यूट्युब लाईव्ह, थर्ड अम्पायर आणि प्रोफेशनल अम्पायर असे अनेक वैशिष्ट्य या स्पर्धेचे असणार आहे. अतिशय दर्जेदार स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे असे प्रदीप जगदाळे आणि आदित्य नाईक यांनी सांगितले.
फ्युचर चॅम्प अंडर १२ क्रिकेट स्पर्धा २० मे ते ५ जून या कालावधीत पडेगाव येथील डी वाय पाटील क्रिकेट मैदानावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने युवा प्रतिभेला एक चांगली संधी आपले कौशल्य दाखवण्यासाठी मिळणार आहे आणि ही स्पर्धा घेण्याचा मागचा हाच मुख्य हेतू असल्याचे प्रदीप जगदाळे व आदित्य नाईक यांनी सांगितले.