
मुंबई : ३३व्या एलआयसी-एमसीए कल्पेश गोविंद कोळी स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात घाटकोपर केंद्राने आपल्या दमदार खेळाने ठाणे केंद्रावर दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात घाटकोपरच्या श्लोक कडव याने हॅटट्रिकसह ५ बळी घेतले, तर दुसऱ्या डावात विहान जोबनपुत्रने ६ बळी टिपत ठाण्याचा डाव कोलमडवला. ठाणे केंद्राने पहिल्या डावात १२२ आणि दुसऱ्या डावात ८८ धावांत गारद होत सामना गमावला. घाटकोपरने पहिल्या डावात १९९ धावा करत आघाडी घेतली आणि नंतर बिनबाद १२ धावा करत सामना आपल्या बाजूने खेचला. श्लोक कडव याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.