बुद्धिबळ स्पर्धेत जान्हवी, ओमची आगेकूच

  • By admin
  • May 12, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

मुंबई : पेडर रोडवरील रशियन हाऊस येथील मुंबई चेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या ऑल इंडिया चेस मास्टर्स एफआयडीई रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा चुरशीच्या वातावरणात रंगत आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत जान्हवी सोनेजी आणि ओम गडा यांनी आपल्या अचूक आणि रणनीतीपूर्ण खेळीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

जान्हवी सोनेजीने काळ्या मोहर्‍यांनिशी खेळताना हेमंत इशानवर तगडी मात करत आपली ताकद दाखवून दिली. दुसऱ्या एका रोमहर्षक लढतीत ओम गडाने अवनीश शेट्टीला पराभूत करत मोठा विजय मिळवला. या दोघांची खेळी यशाच्या पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली.

या स्पर्धेत दक्ष जागेसिया, आर्यन कापडी, अजय अग्रवाल, दर्श शेट्टी, ओम गडा, जान्हवी सोनेजी अभिषेक पाटील, स्वामीनाथन वागेश, आझाद इराणी यांनी विजयी आगेकूच कायम ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *