
जळगाव ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र राज्य सेपक टकरॉ असोसिएशन नागपूर यांच्या वतीने पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ सेपक टकरॉ निवड चाचणी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अलिबाग बीच येथे आयोजित करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला त्यात जळगाव जिल्ह्यातील अबुझर बागवान व फैजान शेख यांनी निवड चाचणी सहभाग घेतला. या चाचणीतून फैजान शेख याची स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवड चाचणी सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी फैजान शेख याची पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ राष्ट्रीय सेपाक टकरॉ स्पर्धेसाठी निवड झाली. जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. ही स्पर्धा १९ ते २४ मे या कालावधीत बीज गेम्स दीव या केंद्रशासित प्रदेशात होणार आहे.
फैजान शेख या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निवडीबद्दल जळगाव जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशनचे अध्यक्ष एजाज अब्दुल गफार मलिक, प्रा चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील, डॉ प्रदीप तळवलकर, प्रा इकबाल मिर्झा, राजेश जाधव, प्रवीण पाटील, प्रा वसीम मिर्झा, शहबाज शेख, आसिफ मिर्झा, इमरान शेख, कैफ पठाण,अमीर खान व सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.