
परिना मदनपोत्राने पटकावले सुवर्ण, तर शुभश्री मोरेला रौप्य
नवी दिल्ली ः अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने सातव्या खेलो इंडिया स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स चमकदार कामगिरी करीत रिदमिक जिम्नॅस्टिक्स प्रकारात परिना मदनपोत्रा हिने सुवर्णपदक आणि शुभश्री मोरेने रौप्यपदक पटकावले.

इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परिनाने हूप, बॉल, क्लब आणि रिबन या चार प्रकारांत मिळून एकूण ८३.६५ गुणांची कमाई केली. शुभश्रीने ८०.२० गुण मिळवले. दिल्लीच्या राचेलदीप हिला कांस्यपदक मिळाले. परिनाने हूप, बॉल, क्लब आणि रिबन या चारही प्रकारात अव्वल स्थान पटकावले. हूप प्रकारात २२.२० बॉल प्रकारात २०.७५ क्लब प्रकारात २०.६० तर रिबन प्रकारात २०.१० गुण पटकावले. तिचीच संघ सहकारी असलेल्या शुभश्रीने हूप प्रकारात २०.४५, बॉल प्रकारात २०.२०, क्लब प्रकारात २०.५० तर रिबन प्रकारात १९.०५ गुण मिळवले.
महाराष्ट्राच्या किमयाचे पदक हुकले
रिदमिक जिम्नॅस्टिकच्या हूप, बॉल, क्लब आणि रिबन या चार प्रकारात मिळून महाराष्ट्राच्या किमया कार्ले हिने ७८.२५ गुणांची कमाई केली. एकूण कामगिरी बघता तिचे गुण तिसऱ्या क्रमांकाचे होते. मात्र जिमनॅस्टिक्समधील नियमानुसार एकाच संघाच्या खेळाडूंना सुवर्ण आणि रौप्यपदक मिळाले असेल तर कांस्यपदक त्याच संघाच्या खेळाडूला दिले जात नाही. त्यामुळे कांस्यपदक किमयाऐवजी दिल्लीच्या राचेलदीप हिला देण्यात आले. राचेलने ७५.८५ गुण मिळवले. किमयाच नव्हे तर महाराष्ट्राच्या देवांगी पवार आणि यशस्वी मोरे या दोन खेळाडूंनीदेखील राचेलपेक्षा जास्त गुण मिळवले. देवांगीने ७७.७० तर यशश्रीने ७६.७५ गुण मिळवले. मात्र नियमानुसार राचेल कांस्यपदकाची मानकरी ठरली.
I am so happy for Maharashtra Gymnastics.
Always giving great results in the National and International Levels.
It’s all because of your combined commitment of Coaches, Gymnasts, Parents and Leadership of Association.
I Salute to You Maharashtra.
Thank you