बार्शी संघाचा युनायटेड क्लबवर मोठा विजय

  • By admin
  • May 13, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

किरण पवार करंडक क्रिकेट स्पर्धा

सोलापूर ः किरण पवार करंडक १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत बार्शी येथील एचपीसीसी संघाने सोलापूरच्या युनायटेड क्रिकेट क्लबचा आठ गडी राखून पराभव करीत विजयी सलामी दिली.

डॅनिश केक पुरस्कृत सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही स्पर्धा येथील डॅनिश केकचे मालक प्रदीप सलगर यांनी पुरस्कृत केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन येथील भंडारी मैदानावर उद्योगपती शोभाकुमार ठाकूर यांचे हस्ते झाले. यावेळी सोलापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष बसवराज सलगर, आयपीएल पंच अनिस सहस्त्रबुद्धे, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबुर्से, उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, टूर्नामेंट कमिटीचे चेअरमन संजय वडजे, १६ व १९ वर्षांखालील निवड समितीचे चेअरमन सुनील मालप, १४ वर्षांखालील निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे, टूर्नामेंट कमिटी सदस्य ऋत्विज चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवानंद अकलूजकर यांनी केले.

ही स्पर्धा सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन रणजीतसिंह मोहिते पाटील, व्हॉइस चेअरमन श्रीकांत मोरे, माजी अध्यक्ष दत्ता सुरवसे व सचिव धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

संक्षिप्त धावफलक 
युनायटेड क्रिकेट क्लब ः  सर्वबाद १०१ धावा (आयुष साळवे ४२, श्रीराज गवळी १४, अभिजीत सिंग ५-१४, हर्षराज देशमुख ३-१७) पराभूत विरुद्ध एचपीसीसी बार्शी ः दोन बाद १०२ (गौरव फुले नाबाद ३२, प्रथमेश थावरे २९, मनीष १६, प्रथमेश चमकेश्वरा १-२४,  श्रीराज गवळी १-२९).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *