
गोव्याच्या राहुल संगमाला उपविजेतेपद
अहिल्यानगर ः मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचा वेदांत पानेसर याने विजेतेपद पटकावले तर गोव्याचा राहुल संगमा याने उपविजेतेपद संपादन केले.
ऑल इंडिया ओपन मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा अहिल्यानगरच्या सप्तक सदन येथे संपन्न झाली. अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित बुद्धिबळ स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.
या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्याम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रमुख पंच प्रवीण ठाकरे (जळगाव), शार्दुल टापसे (सांगली), पवन राठी (सोलापूर), शिशिर इंदुरकर (नागपूर), देवेंद्र ढोकळे, प्रशांत घंगेकर, किरण सरोदे, प्रकाश गुजराथी, डॉ स्मिता वाघ,अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर आदींसह खेळाडू-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
अंतिम निकाल
ओपन ग्रुप ः १. वेदांत पानेसर, २. राहुल संगमा, ३. विरेश एस, ४. विक्रमादित्य कुलकर्णी, ५. कृष्णा तेजा, ६. इंद्रजीत महिंद्रकर, ७. श्रीराज भोसले, ८. अर्णव कोळी, ९. अरुण कटारिया, १०. शौनक बडोले, ११. आदित्य बारटक्के, १२. अथर्व सोनी, १३. चैतन्य गावकर, १४. विराज राणे, १६. अपूर्व वाकचौरे.
बेस्ट रेटिग १७९९ ग्रुप ः १. अपूर्व देशमुख, २. आराध्य टिकम, ३. उमेश आर्या, ४. साहिल घोरगटे, ५. भुवन शितोळे, ६. प्रसाद खेडकर, ७. मारुती कोंडागुरळे, ८. युधार्थ नरोडे, ९. हित बलदवा, १०. संयम विश्वेश, ११. हरदन शहा, १२. मोहनकर रुतम, १३. चैतन्य पाटील, १४. विंहग चांगन, १५. यश राणे.
बेस्ट रेटिंग १५९९ ग्रुप : १. आदर्श पाटील, २. अनिश रावते, ३. जीनम संकलेचा, ४. सतीश म्हस्के, ५. ऋषिकेश लोहणकर, ६. सार्थक शिंदे, ७. ओम वैद्य, ८. सुनील जोशी.
बेस्ट अनरेटेड : १. शौर्य भोंदवे, २. राहुल ढवळे, ३. स्वराज विश्वासे, ४. देवांश तोतला, ५. पार्श्व लिंगाडे, ६. प्रथमेश देवडेकर, ७. समर्थ भारस्कल, ८. श्रीहान करमकर.
बेस्ट ६० जेष्ठ खेळाडू ः १. मिलिंद पारले, २. दीपक ढेपे, ३. ए. इ. सॅम्युअल, ४. देवेंद्र चिंचाणी, ५. सुरेंद्र सरदार, ६. ईश्वर रामटेके, ७. बलभीम कांबळे, ८. चंद्रकांत चौधरी.
उत्कृष्ट महिला ः १. त्रिशा मारगज, २. भूमिका वागळे, ३. तन्मई घाटे, ४. शर्वी बाकलीवाल, ५. सई देव, ६. हिरणमयी कुलकर्णी, ७. दृश्य नाईक, ८. श्रावणी नानकर.
उत्कृष्ट अहिल्यानगर खेळाडू ः १. आशिष चौधरी, २. हर्ष घाडगे, ३. आयुष वाघ, ४. ऋषिकेश रानडे, ५. स्वराज काळे, ६. दर्श पोरवाल, ७. श्रीराज इंगळे, ८. ईशान चोरडिया.
उत्कृष्ट अहिल्यानगर तालुका ः १. वरद जोशी, २. समृद्धी कोटे, ३. विराज मचे, ४. वेदांत शिंदे, ५. अन्वय जोशी.
उत्कृष्ट ११ वर्षांखालील ः १. रियांश द्विवेदी, २. वरद पाटील, ३. नैतिक माने, ४. तीर्थ कोदरे, ५. श्रेयस नलावडे, ६. मोहन झडे, ७. मानस करणसे, ८. आराध्या देसाई.
उत्कृष्ट ९ वर्षांखालील : १. आदेन लासरदो, २. अनिश जवळकर, ३. जयदेव महडा, ४. पृथ्वा ठोंबरे, ५. अंश पटेल, ६. शर्वी भंगुरकर, ७. अन्वित गायकवाड, ८. रीवा चारणकर.
उत्कृष्ट ७ वर्षांखालील : १. कविष भट्टाड, २. शिवांश श्रीगादी, ३. मुगांक पाटील.