
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयाच्या एमबीए विभागातील विद्यार्थ्यांनी ‘मेटलमॅन ऑटो लिमिटेड’ या नामांकित औद्योगिक समूहाला अभ्यास भेट दिली. या औद्योगिक भेटीत एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या भेटीदरम्यान प्रा प्रदीप गिऱ्हे यांनी उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्पे, गुणवत्ता व्यवस्थापन, व संपूर्ण व्यवस्थापन प्रणाली याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. मानव संसाधन व्यवस्थापन या विभागाची माहिती विजय साळवे यांनी दिली. त्यांनी मेटलमॅन ऑटो लिमिटेड कंपनीची स्थापनेपासून आजपर्यंतची वाटचाल, यशोगाथा आणि मानव संसाधन विभाग व्यवस्थेतील नवकल्पना याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
तसेच गजानन वतनदार आणि सुशील देओळे यांनी औद्योगिक सुरक्षा नियम, आपत्कालीन व्यवस्थापन आणि त्यासंबंधी करावयाच्या उपाययोजना याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी चेसिस वेल्डिंग प्रक्रियेचे प्रात्यक्षिक ऑटोमेशनच्या माध्यमातून दाखवण्यात आले. या प्रसंगी रंगनाथ गायकवाड आणि विकास शिंदे यांनी ईडी शॉपमधील स्थापनेविषयी माहिती दिली. धनश्री महाजन यांनी विद्यार्थ्यांना ऑफ जॉब ट्रेनिंग संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले. या औद्योगिक भेटीत एमबीए विभागाचे विभागप्रमुख प्रा प्रदीप गिऱ्हे, डॉ प्रद्युम्न शास्त्री, प्रा वर्षा करडखेकर आणि प्रा शुभम पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.