
मुंबई : ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने एअर इंडिया मैदानात एमसीसीच्या (मुंबई क्रिकेट क्लब) युवा क्रिकेटपटूंना श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास याच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या “हाय परफॉर्मन्स कॅम्प” मध्ये चामिंडा वास यांच्यासह मुंबईचा माजी रणजीपटू वासिम जाफर, ज्वाला सिंग आणि मुंबई रणजी संघातील आणखी काही क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन या खेळाडूंना लाभणार आहे. या शिबिरात मुंबई क्रिकेट क्लबचे संपूर्ण भारतातील युवा क्रिकेटपटू सहभागी होणार असून १० दिवस त्यांना हे दिग्गज खेळाडू प्रशिक्षण देणार आहेत. दहा दिवसाच्या कॅम्प नंतर त्यांना प्रत्यक्ष क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव सुद्धा मिळणार आहे.
मुंबई क्रिकेट क्लबच्या ठाणे येथील अकादमीच्या मैदानावर देखील काही दिवस या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षी होणाऱ्या या शिबिरातून मुंबईला आणि पर्यायाने भारताला पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल सारखे गुणवान युवा खेळाडू मिळाले आहे.