
मुंबई : यंदाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद मिळवणाऱ्या कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघाचा नुकताच गौरव सोहळा कोल्हापूर येथील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
या गौरव समारंभात खासदार धनंजय महाडिक व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णात पाटील यांच्या हस्ते खेळाडूंचा, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचा सन्मानचिन्ह, दहा हजारांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रा संदीप लवटे यांच्याकडून गणवेश, प्रा चंद्रशेखर शहा यांच्याकडून मनगटी घड्याळ देखील प्रदान करण्यात आली. शेखर शहा यांनी सर्वांचे स्वागत केले.
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह डॉ रमेश भेंडिगिरी यांनी प्रास्ताविकात जिल्हा कबड्डी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. शंकर पवार यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला. अण्णासाहेब गावडे यांनी आभार मानले. वर्षा देशपांडे यांनी निवेदन केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा संभाजी पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, दत्तात्रय खराडे, कार्याध्यक्ष विलास खानविलकर, सहकार्यवाह उदय चव्हाण, अँड शशिकला पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू उमा भेंडिगिरी, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पुंडलीक जाधव, भगवान पवार, बाळासाहेब चव्हाण, रघुनाथ पाटील, देखील उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशने या सोहळ्याचे दिमाखदार आयोजन केले होते. कोल्हापूरच्या पुरुष विजेत्या संघात तुषार पाटील, दादासाहेब पुजारी, ओमकार पाटील, आदित्य पोवार, साईप्रसाद पाटील, सौरभ फगरे, साहिल पाटील, अविनाश चरापले, अवधूत पाटोळे, सौरभ इंगळे, धनंजय भोसले, सर्वेश करवते यांचा समावेश होता. प्रशिक्षक म्हणून शहाजहान शेख तर संघ व्यवस्थापक म्हणून प्राध्यापक संदीप लवटे हे होते.