खेलो इंडिया बीच स्पर्धेसाठी गणेश माळवे, दर्शन हस्ती यांची नियुक्ती 

  • By admin
  • May 14, 2025
  • 0
  • 38 Views
Spread the love

परभणी ः  भारत सरकार क्रीडा मंत्रालय व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने  पहिली खेलो इंडिया बीच स्पर्धा दीव दमण या ठिकाणी १९ ते २४ मे या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत सेपक टकारा स्पर्धा दीव येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र सेपक टकरा संघाच्या प्रशिक्षकपदी गणेश माळवे आणि सहप्रशिक्षक म्हणून दर्शन हस्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पहिल्या खेलो इंडिया बिच सेपक टकारा स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून गणेश माळवे (नूतन विद्यालय सेलू) व सहप्रशिक्षक दर्शन हस्ती (वर्धा) यांची निवड झाली आहे. गणेश माळवे हे क्रीडा शिक्षक म्हणून नूतन विद्यालय सेलू येथे कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य सेपक टकरा संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व परभणी जिल्हा सचिव म्हणून माळवे हे काम पाहत आहेत.  ३८व्या नॅशनल गेम्स उत्तराखंड येथे महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापक म्हणून त्यांनी कार्य केले आहे.  तसेच सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स बिहार येथे होत असलेल्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघ निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

दर्शन हस्ती हे अवधेश क्रीडा मंडळ वर्धा, सेपक टकरा राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स बिहार येथे प्रशिक्षक म्हणून कार्य केले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघ कांस्यपदक मानकरी ठरला आहे.

क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक क्रीडा सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, सेपक टकरा संघटनेचे अध्यक्ष विपीन कामदार, सरचिटणीस डॉ योगेंद्र पांडे, डॉ अमृता पांडे, प्रवीण कुपटीकर, डॉ विनय मुन, शेख चाँद, रवी बकवाड, परवेज खान, अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, डॉ एस एम लोया, डी के देशपांडे, डॉ व्ही के कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, रणजीत काकडे, पांडुरंग रणमाळ, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, रोहिदास मोगल, प्रशांत नाईक, संजय भुमकर, डी डी सोन्नेकर, प्रा नागेश कान्हेकर यांनी व विविध क्रीडा संघटनाच्या वतीने अभिनंदन करुन पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *