नांदेड बुद्धिबळ स्पर्धेत श्रावण निळकंठला विजेतेपद 

  • By admin
  • May 14, 2025
  • 0
  • 151 Views
Spread the love

नांदेड ः जी एच रायसोनी मेमोरियल नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत ओपन गटात श्रावण निळकंठ याने विजेतेपद पटकावले. अन्य गटात रुद्रांश होट्टे, वरद पैंजणे, आदित्य गायकवाड, चेतन चौडम, प्रद्युम्न कटके, ऋषिकेश गव्हाणे यांनी अजिंक्यपद संपादन केले. 

नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिड चेस असोसिएशन, जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन नागपूर व सक्षम चेस अकॅडमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गणराज बंकेट अँड कॉन्फरन्स हॉल येथे ही स्पर्धा संपन्न झाली.

या बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ साहेबराव मोरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या अनुराधा मिस, सुनील देशमुख, फादर मुथुस्वामी, आदित्य तुंगेनवार, राजु सुरा, डॉ दिनकर हंबर्डे (सचिव), सुचिता हंबर्डे, सचिन शिंदे, प्राचार्य अविनाश कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील एकूण १९२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त १९ खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते.

या पारितोषिक वितरण प्रसंगी माजी राज्यमंत्री डी पी सावंत व डॉ साहेबराव मोरे   यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत एकूण रोख रक्कम रुपये ३० हजार रुपये तसेच २७ ट्रॉफी, मेडल व सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.. तसेच नागपूरचे जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशनचे भूषण श्रीवास यांनी रोख रक्कम स्पॉन्सर करून स्पर्धेस सहकार्य केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सक्षम हंबर्डे व प्रकाश कदम यांनी केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल

खुला गट ः १. निळकंठ श्रावण, २. आदर्श पाटील, २. आदित्य चिंचोलकर, ४. आशिष लोखंडे, ५. श्रीनिवास गीते, ६. प्रथमेश सुतार, ७. सिद्धार्थ हटकर, ८. अधिराज पाटील, ९. अभय अन्नपूर्णे, १०. संजय तिवसकर.

अंडर ९ मुले ः १. रुद्रांश होट्टे, २. रियांश घंटे, ३. उत्कर्ष पांचाळ, ४. आरुष विडेकर, ५. शौर्य मुप्पानेनी., मुलींचा गट ः १. अंशिका अवरदे, २. अनुश्री लोखंडे, ३. द्रिती धोंडे, ४. देशमुख धनिष्का.

अंडर ११ मुले ः १. वरद पैंजणे, २. देवांश चव्हाण, ३. अर्णव तोष्णीवाल, ४. आयुष सूर्यवंशी, ५. अद्वैत घन., मुलींचा गट ः १. रितिका बनकर, २. रेवा तौर, ३. संनिधी पाटील, ४. नक्षत्र पल्लेवाड, ५. गार्गी संगी.

अंडर १३ मुले ः १. आदित्य गायकवाड, २. सर्वज्ञ टाकळकर, ३. सत्यजित गायकवाड, ४. ऋषिकेश शिवकुमार, ५, स्वहम वाघमारे. मुलींचा गट ः १. ओवी पवार, २. हर्षिता खटिंग, २. ऋतुजा कदम, ३. श्राव्या धोंडे, ४. भार्गवी माने.

अंडर १५ मुले ः १. चेतन चौडम, २. मंथन भुसा, ३. रणधीर बनकर, ४. शार्दुल देऊळगावकर, ५. स्वयंम सूर्यवंशी.  मुलींचा गट ः १. अवनी कापसे, २. शताक्षी गादेवार, ३. माहेश्वरी पेटेकर, ४. भूतणर श्रावणी, ५. निवेदिता कोंडलवाडे.

अंडर १७ मुले ः १. प्रद्युम्न कटके, २. स्वराज माळी, ३. मयूर जाधव, ४. देवेश डांगे,४. सम्यक पवार. मुलींचा गट ः १. शिवानी मोरे, २. आरुषी मोरे.

अंडर १९ मुले ः १. ऋषिकेश गव्हाणे, २. निशांत बोकारे, ३. सुमित वायवाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *