
१ सुवर्ण, १ रौप्य, ३ कांस्य पदकांची कमाई,
पटना (बिहार) : चिवट झुंज देत महाराष्ट्राच्या ऋतुजा गुरवने खेलो इंडिया स्पर्धेतील कुस्ती मैदानात आपले सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. महाराष्ट्राच्या मल्लांनी स्पर्धेच्या दुसर्या दिवशी १ सुवर्ण १ रौप्य व १ कांस्य पदकाची लयलूट केली.
ज्ञानभवन सांस्कृतिक हॉलमध्ये सुरू असणार्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या युवा मल्लांनी पुन्हा एकदा खेलो इंडिया कुस्ती मैदान गाजवले. मुलींच्या ४६ किलो गटातील फ्रीस्टाईल प्रकारात हरयाणाच्या अन्नुवर मात केली. कोल्हापूरच्या ऋतुजाने सुरूवातीपासून आक्रमक कुस्ती डावपेचाचे प्रदर्शन घडवले.
दुसर्या फेरीत ६-२ गुणांची कमाई करीत तिने अंतिम लढत जिंकली. गत स्पर्धत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. वर्षभर कोल्हापूरातील खेलो इंडिया अॅकॅडमीत कसून मेहनत करीत तीने पदकाचा रंग बदलण्यात यश संपादन केले. मानतेश पाटील यांच्या मार्गदर्शक ती सराव करते.
ग्रीको रोमन प्रकारातील ७१ किलो गटात बारामतीच्या अभिमन्यु चौधरवर हरियाणाच्या विनीतकुमाने बाजी मारली. १-९ गुणांनी अभिमन्युना रूपेरी यशावर समाधान मानावे लागले. १७वर्षीय अभिमन्यु पुण्यात सराव करत असतो. ग्रीको रोमन प्रकारातील ५१ किलो गटात कोल्हापूरच्या आदित्य जाधवने यजमान बिहारच्या जहिर रजाकला १०-१ गुण फरकाने लोळवून मात करीत कांस्यपदक पटकावले. .
५५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात सोहम कुंभारने मध्य प्रदेशच्या हितेश कुशवाहवर १०-० गुणांनी एकतर्फी पराभव करीत कांस्य पदकावर नाव कोरले. ५५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात धनराज जमनिक याला राजस्थानचा राकेश कुमार गैरहजर राहिल्याने कांस्यपदक बहाल करण्यात आले.