
नाशिक ः केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डतर्फे आयोजित इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पी एम श्री केंद्रीय विद्यालय आर्टिलरी सेंटर नाशिक रोड कॅम्प येथील राष्ट्रीय खेळाडू मृण्मयी विजय शिंदे हिने ९५.६ टक्के गुणांसह प्रथम स्थान प्राप्त केले. खुशी सिंग हिने ९५.२ टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय स्थान मिळविले.
इयत्ता बारावी विज्ञान शाखेमधून प्रसनजीत लोंढे याने ८९.६ टक्के गुण प्राप्त केले. वाणिज्य शाखेत कुणाल खंडागळे याने ८८.४ टक्के गुण प्राप्त केले तर कला शाखेत प्रियम चौबे याने ८७ टक्के गुण प्राप्त केले.
यशस्वी विद्यार्थ्याचे विद्यालय प्रबंधन समितीचे अध्यक्ष ब्रिगेडियर आशिष भारद्वाज, विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गजराज मीना, श्रीमती चांदोरकर, निमीषा सिंह, तुषार वारडे, बिरबल यादव आदी शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.