
छत्रपती संभाजीनगर ः साउथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत स्वरा चंद्रकांत थोरात हिने म्युझिकल फॉर्ममध्ये सुवर्णपदक आणि बॉक्सिंग स्पर्धेत ३६ किलोखालील गटात रौप्यपदक अशी दोन पदक जिंकून इतिहास रचला.
ऑलिंपियन्स स्पोर्ट्स क्लबची खेळाडू स्वरा चंद्रकांत थोरात हिने गोवा येथे झालेल्या अम्युचर बॉक्सिंग साउथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत ३६ किलो आतील गटात रौप्यपदक आणि म्युझिकल फॉर्ममध्ये सुवर्णपदक पटकावले. बॉक्सिंग राज्य संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख, बॉक्सिंग जिल्हा संघटनाचे अध्यक्ष पंकज राठोड व सचिव निखिल पुसे, ऑलिंपियन्स स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक बी एस राठोड यांनी स्वरा हिचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.