
आयुष्का गाडेकरला सुवर्ण, श्रुती श्रीनाथला कांस्य पदक
मुंबई ः साई एनसीओई मुंबई केंद्रातील कुस्तीपटूंनी बिहार येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत शानदार कामगिरी बजावत पदकांची कमाई केली आहे. कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी नोंदवून साई एनसीओई केंद्राचा नावलौकिक वाढवला आहे.

या स्पर्धेत कुस्तीपटू आयुष्का गाडेकर हिने ५७ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून स्पर्धा संस्मरणीय बनवली. श्रुती श्रीनाथ हिने ६१ किलो वजन गटात कांस्य पदक जिंकण्याची निकराची झुंज दिली आणि कांस्यपदक पटकावले. या दिमाखदार कामगिरीबद्दल भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी पदक विजेत्या कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.