
छत्रपती संभाजीनगर अंडर १४ प्रीमियर लीग क्रिकेट ः दानिश शेख सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पटेल हॉस्पिटल पाचोड संघाने ओंकार रोडवेज संघावर सहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात दानिश शेख याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल पाटील आणि जाधव क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक संदीप जाधव यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या सामन्यात ओंकार रोडवेज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सर्वबाद ७६ धावसंख्या उभारली. पटेल हॉस्पिटल पाचोड संघाने १२.२ षटकात चार बाद ७७ धावा फटकावत सहा विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात अनुष दहिफळे याने २८ चेंडूत ३२ धावा काढल्या. त्याने सहा चौकार मारले. अर्शान पठाण याने तीन चौकारांसह १८ धावा काढल्या. मयंक कदम याने १६ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत पार्थ भस्मे याने ६ धावांत दोन विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. दानिश शेख याने १३ धावांत दोन बळी घेऊन सामनावीर पुरस्कार संपादन केला. यश जाधव याने ८ धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ओंकार रोडवेज ः २० षटकात सर्वबाद ७६ (राज घोडेले ६, मयंक कदम १६, प्रत्युष गर्ग ६, शुभ मुथा नाबाद ८, अक्षरा डांगे ५, इतर २०, पार्थ भस्मे २-६, दानिश शेख २-१३, गौरव अमोल १-१६, यश जाधव १-८, अर्शान पठाण १-३, शिव सिंग १-२, उत्कर्ष पाटील १-५) पराभूत विरुद्ध पटेल हॉस्पिटल पाचोड ः १२.२ षटकात चार बाद ७७ (दानिश शेख ९, अनुष दहिफळे ३२, अर्शान पठाण १८, यश जाधव नाबाद ३, तुषार बडगुजर नाबाद १, इतर १३, मयंक कदम १-९, अक्षरा डांगे १-१७, स्वप्नील जाधव १-१०, समर्थ ढाकणे १-७). सामनावीर ः दानिश शेख.