
पुणे ः पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या वतीने रमेश दामले मेमोरियल पुणे जिल्हा जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत सलोनी साळुंखे, त्विशा दीक्षित यांनी तिहेरी मुकुट संपादन केला.
डेक्कन जिमखाना टिळक तलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात सलोनी साळुंखेने ०१.०८.२८ सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, आद्विका सोनी (०१.११.७३ से) व लावण्या करडे (०१.१४.०४ से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सलोनी साळुंखेने ०२.५८.०० सेकंद वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले. ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये सलोनी साळुंखे हिने ०५.०९.३१ सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला.
वरिष्ठ मुलींच्या गटात २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात त्विशा दीक्षितने ०२.३९.१२ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. ५० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात त्विशा दीक्षितने ००:३३.९० सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले. ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये त्विशा दीक्षितने ०५.२९.४१ सेकंद वेळ नोंदवत प्रथम, तर मैथिली चिटणीस (०५.४२.०९ से) हिने दुसरा आणि धन्यता ओसवाल (०६.५४.८१ से) हिने तिसरा क्रमांक पटकावला.
२०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १७ वर्षांखालील मुलांच्या गटात शाल्व मुळ्ये (०२.१५.१८ से) याने पहिले स्थान पटकावले. याच गटात वेदांत तांदळे (०२.१५.३०से) याने दुसरे आणि ओजस पिंगळे (०२.२४.८१ से) तिसरे स्थान पटकावले.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात ५० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात श्रीलेखा पारिक हिने ००:३१.९७ सेकंद वेळ नोंदवून विजेतेपदाचा मान पटकावला. १४ वर्षांखालील १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये मुलांच्या गटात ईशान माझिरे (०१:०४.४७ से) याने तर, मुलींच्या गटात दक्षिता दुबे (०१:०६.८८ से) वेळ नोंदवून विजेतेपदाला गवसणी घातली.
अंतिम निकाल
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (६ वर्षाखालील मुले) : १. युवराज तिडके, २. नील देशमुख, ३. रिषभ गोटे.
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (६ वर्षांखालील मुली) : १. आरोही खिंवसरा, २. मीरा गोखले, ३. रमा मोकाटे.
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (७ वर्षांखालील मुले) : १. निमिष करडे, २. अद्वैत चाकणकर ३. निधीश सोनावणे.
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (७ वर्षांखालील मुली) : १. अवनी यादव, २. आनंदी भट, ३. सावी जोशी.
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (८ वर्षांखालील मुले) : १. तारुष देशपांडे, २. अर्जुन कुरुडकर, ३. कबीर साळवे.
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (८ वर्षांखालील मुली) : १. परिणया घाडगे, २. आर्ना हिंगणेकर, ३. प्रिशा बनसोड.
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (१० वर्षांखालील मुले) : १. सत्यजित मोहिते, २. रियान जोशी, ३. अर्जुन जोशी.
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (१० वर्षांखालील मुली) : १. नायरा शहा, २. आराध्या जाधव, ३. श्रीदा कामठे.
२०० मीटर बटरफ्लाय (१२ वर्षाखालील मुले) : १. रुद्र गुप्ता, २. आरव गुप्ता, ३. मेधांश ठाणे.
२०० मीटर बटरफ्लाय (१२ वर्षांखालील मुली) : १. सलोनी साळुंखे, २. लावण्या करडे, ३. अनन्या पडवळ.
२०० मीटर बटरफ्लाय (१४ वर्षांखालील मुले) : १. आयुष राजापुरे, २. रुद्र वाडकर, ३. अनय पाध्ये.
२०० मीटर बटरफ्लाय (१४ वर्षांखालील मुली) : १. कैजा शंकर, २. शैली बेहेरे, ३. दिया ओसवाल.
२०० मीटर बटरफ्लाय (१७ वर्षांखालील मुले) : १. शाल्व मुळ्ये, २. वेदांत तांदळे, ३. ओजस पिंगळे.
२०० मीटर बटरफ्लाय (१७ वर्षांखालील मुली) : १. साराक्षी दांगट, २. अनुष्का चौडा, ३. धन्यता ओसवाल.
२०० मीटर बटरफ्लाय (वरिष्ठ खुला गट) : १. शुभम धायगुडे, २. अर्णव भडेकर, ३. अथर्व संकपाळ.
२०० मीटर बटरफ्लाय (वरिष्ठ मुली) : १. त्विशा दीक्षित, २. साराक्षी दांगट.
४०० मीटर फ्री स्टाईल (१२ वर्षांखालील मुले) : १. हर्षदीत्य राणावत, २. विवान सोरटे, ३. रेयांश देवकर.
४०० मीटर फ्री स्टाईल (१२ वर्षांखालील मुली) : १. सलोनी साळुंखे, २. लावण्या करडे, ३. तनिषा बुधीसागर.
४०० मीटर फ्री स्टाईल (१७ वर्षांखालील मुले) : १. शाल्व मुळ्ये, २. चैतन्य शिंदे, ३. सोहम वाईके.
४०० मीटर फ्री स्टाईल (१७ वर्षांखालील मुली) : १. त्विशा दीक्षित, २. मैथिली चिटणीस, ३. धन्यता ओसवाल.
१०० मीटर फ्री स्टाईल (१२ वर्षांखालील मुली) : १. सलोनी साळुंखे, २. अद्विका सोनी, ३. लावण्या करडे.