प्रमोद वाघमोडे यांचे आवाहन
ठाणे ः दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दहावी आणि बारावी परीक्षेत ग्रेस गुणांचा लाभ होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आणि मुंबई विभाग संपर्क प्रमुख प्रमोद वाघमोडे यांनी केले आहे.
मुंबई विभाग संपर्क प्रमुख प्रमोद वाघमोडे म्हणाले की, काहीविद्यार्थ्यांनी ग्रेस गुणांबाबत ऑनलाईन सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ग्रेस गुण मिळू शकले नाहीत. अशा सर्व खेळाडूंनी कारणांसह माहिती ८१०८२०३७९३ या क्रमांकावर महासंघाकडे त्वरीत पाठवावी. अशा विद्यार्थ्यांनी अथवा त्यांच्या क्रीडा शिक्षकांनी सोमवारी (१९ मे) थेट संपर्क साधावा, असे आवाहन प्रमोद वाघमोडे यांनी केले आहे.