
मुंबई ः पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या दर्श शेट्टीने मुंबई चेस सेंटर, रशियन हाऊस, पेडर रोड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय चेस मास्टर्स फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत दुसऱ्या बोर्डवर युवा चॅलेंजर क्रिस इसायाला पराभूत केले.
टॉप बोर्डवर, यश कापडीने श्रावण अग्रवालला हरवून पूर्ण गुण मिळवून फॉर्म कायम ठेवला. दरम्यान, श्रेयस कौशिकने चुरशीच्या लढतीत दीपक सोनीला हरवले. वुमन कँडिडेट मास्टर (डब्ल्यूसीएम) कीर्ती पटेलने चौथ्या बोर्डवर सिद्धार्थ कुमारवर विजय मिळवला. चारही बुद्धिबळपटूंनी कमालीचे सातत्य राखताना प्रत्येकी ५ गुणांसह संयुक्तरित्या अव्वल स्थान राखले आहे.
पाचवी फेरीचे निकाल
यश कापडी विजयी विरुद्ध श्रावण अग्रवाल, दर्श शेट्टी विजयी विरुद्ध ख्रिस इसाया, श्रेयस कौशिक विजयी विरुद्ध दीपक सोनी, कीर्ती पटेल विजयी विरुद्ध सिद्धार्थ कुमार, वागेश स्वामीनाथन विजयी विरुद्ध युती पटेल, संविद पासबोला बरोबरी विरुद्ध श्रद्धा पाडवेकर, हृदय गोयल विजयी विरुद्ध सिद्धार्थ गुप्ता, अवनी उडिपी बरोबरी विरुद्ध रवी विहान, यती अग्रवाल बरोबरी विरुद्ध कुश अग्रवाल, दक्ष जागेसिया विजयी विरुद्ध सर्वेश सावंत.