< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); छत्रपती संभाजीनगर तायक्वांदो खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी – Sport Splus

छत्रपती संभाजीनगर तायक्वांदो खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी

  • By admin
  • May 17, 2025
  • 0
  • 67 Views
Spread the love

फेडरेशन कप नॅशनल तायक्वांदो स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी नाशिक येथे झालेल्या पहिल्या फेडरेशन कप नॅशनल तायक्वांदो अजिंक्यपद २०२५ आणि दुसऱ्या किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स नॅशनल २०२५ स्पर्धेमध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. खेळाडूंनी आपल्या कौशल्य, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्राला अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून दिला आहे.

फेडरेशन कप नॅशनल २०२५ स्पर्धेमध्ये ईश्वरी सोनवणे हिने अंडर ५२ किलो कनिष्ठ महिला गटात सुवर्णपदक पटकावले असून ती मलेशिया येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारत संघाच्या अंतिम निवड चाचणीसाठी पात्र ठरली आहे. कृष्णा आधात याने अंडर-३२ किलो सब-ज्युनियर गटात सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे त्याने कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी अंतिम निवड चाचणीसाठी पात्रता मिळवली आहे.

किंजल सोनवणे हिने अंडर-३७ किलो कॅडेट महिला गटात कांस्यपदक मिळवले असून, समीक्षा सोनवणे हिने अंडर-३३ किलो कॅडेट महिला गटात कांस्यपदक जिंकले आहे. या दोघींनाही आशियाई स्पर्धेच्या अंतिम भारत संघ निवड चाचण्यांसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तसेच प्रणव गोरे (अंडर-४१ किलो, कॅडेट पुरुष) व अथर्व लहकार (अंडर-७३ किलो, कनिष्ठ पुरुष) यांनी सुद्धा उत्कृष्ट सहभाग नोंदवला.

दुसऱ्या किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स नॅशनल २०२५ स्पर्धेत किंजल सोनवणे (अंडर-३७ किलो) व समीक्षा सोनवणे (अंडर-३४ किलो) या दोन्ही खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. समर्थ सोनवणे (अंडर-२३ किलो), विराज सोनवणे (अंडर-२४ किलो) आणि सार्थक लोखंडे (अंडर-३१ किलो) यांनी अनुक्रमे रौप्यपदक जिंकून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

या सर्व विजेत्या आणि सहभाग घेतलेल्या खेळाडूंचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनतर्फे अध्यक्ष प्रा प्रतिभा सानप व सचिव डॉ प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच सदस्य राजेश सातोनकर, विजय सिंगारे, हृषिकेश आपोणारायण, डॉ विक्रम चौबे, नयन तिवारी, संकेत कुलकर्णी, रुपेश शिंदे, संकते व्यावहारे, मोहित देशपांडे, संतोष बस्नेत, कुणाल राठोड, प्रबिन बिश्वकर्मा, अजिंक्य देवरे, अरुण गाडेकर, सुनील बस्नेत, दीपक भोर, शुभम महाजन आणि सुरेश जाधव यांनीही सर्व खेळाडूंना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *