
खेलो इंडिया युथ गेम्स
सोलापूर ः राजगीर (बिहार) येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत तलवारबाजीमध्ये ईपी या सांघिक प्रकारात महाराष्ट्राने सुवर्णपदक पटकावले. यात सोलापूरच्या प्रथमेश कस्तुरे व आदित्य निकते यांचा समावेश होता.

महाराष्ट्राच्या ईपी संघाने पंजाब संघाचा ४५-४१ असा पराभव केला. मणिपूर बरोबर झालेले अत्यंत चुरशीच्या सामन्यात मणिपूर संघास ४२-४१ असे नामविले. अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्राने हरियाणाचा ४५-४३ असा विजय मिळवला. या खेळात सोलापूरच्या प्रथमेश कस्तुरे व अजित आदित्य निकते यांनी उत्कृष्ट खेळ करून महाराष्ट्र संघास सुवर्णपदक प्राप्त करून दिले.
हे दोन्ही खेळाडू दमानी शाळेचे असून आदित्य निकते याला दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू ऑल स्टार फेन्सिंग क्लबचे असून त्यांना पवन भोसले, सोहम साठे व वेदांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश काटुळे, जिल्हा सचिव प्रा. दीपक शिंदे, संघटना सदस्य जितेंद्र पवार, अनिल पाटील व राजेंद्र गोटे यांनी अभिनंदन केले.