
नाशिक : बिहार येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत नाशिकची तलवारबाजी खेळाडू मिताली परदेशी हिने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून रौप्यपदक पटकावले.
तलवारबाजीच्या ईपी या क्रीडा प्रकारात खेळताना मितालीने उप-उपांत्य लढत ४५-३१ अशी जिंकली, तर उपांत्य लढत ४५-३९ अशी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत मितालीने हरियाणाच्या दीपांशी हिला चांगलेच झुंजविले. परंतु शेवटच्या दीड मिनिटात मितालीला तीन गुण गमवावे लागले आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल.
राष्ट्रीय रौप्य पदकाबरोबरच मितालीने दहावी परीक्षेत तब्बल ९६ टक्के गुण प्राप्त करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला. ती निर्मला कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थी आहे.
या दुहेरी यशामुळे खेळ आणि अभ्यास या दोन्हींचा योग्य समन्वय साधल्यास दोन्हीही क्षेत्रात यश मिळवता येते याचे उदाहरण मितालीने घालवून दिले. मिताली गेल्या पाच वर्षापासून फेन्सिंग प्राशिक्षक प्रसाद परदेशी, राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमीत सराव करत आहे. मितालीच्या या दुहेरी यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.