
दामले स्मृती पुणे जिल्हा जलतरण स्पर्धा
पुणे ः पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या वतीने रमेश दामले मेमोरियल पुणे जिल्हा जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या दिवशी ईशान तिडके, कैजा शंकर, त्विशा दीक्षित यांनी दुहेरी मुकुट संपादन केला.
डेक्कन जिमखाना टिळक तलाव येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ईशान तिडकेने ०२.५६.४७ सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. तर, आरूष जाधव (०२.५७.२३ से) याने दुसरा आणि उदयन देशमुख (०३.०४.९४ से) याने तिसरा क्रमांक पटकावला. ४०० मीटर मिड रिलेमध्ये देखील ईशान तिडके याने ०५.३७.६२ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.
४०० मीटर मिड रिले प्रकारात १७ वर्षांखालील मुलींच्या गटात त्विशा दीक्षित हिने सुरेख खेळ करत ०५.२९.४१ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाचा मान पटकावला. याच गटात मैथिली चिटणीस (०५.४२.०९ से) व धन्यता ओसवाल (०६.५४.८१ से) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.
४०० मीटर मिड रिलेमध्ये वरिष्ठ मुलींच्या गटात त्विशा दीक्षितने ०५.२९.४१ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले. ८०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कैजा शंकर हिने ०९.५९.२५ सेकंद वेळ नोंदवून विजेतेपदाला गवसणी घातली. याचबरोबर २०० मीटर फ्री स्टाईल मध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कैजा हिने ०२:२२.४४ वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.
अंतिम निकाल
५० मीटर बॅकस्ट्रोक (६ वर्षांखालील मुले) : १. युवराज तिडके, २. श्लोक कुलकर्णी, ३. वरद भारतीकर. ५० मीटर बॅकस्ट्रोक (६ वर्षांखालील मुली) : १. मीरा गोखले, २. काशवी पाटणकर, ३. हरिप्रिया वाय.
५० मीटर बॅकस्ट्रोक (७ वर्षांखालील मुले) : १. निधीश सोनावणे, २. निमिष करडे, ३. अद्वैत चाकणकर. ५० मीटर बॅकस्ट्रोक (७ वर्षांखालील मुली) : १. अवनी यादव, २. काव्या वाघमारे, ३. काव्या साने.
५० मीटर बॅकस्ट्रोक (८ वर्षाखालील मुले) : १. तारुष देशपांडे, २. अर्जुन कुरुडकर, ३. विराज पाटील. ५० मीटर बॅकस्ट्रोक (८ वर्षांखालील मुली) : १. परिणय घाडगे, २. प्रिशा बनसोड, ३. इरा चोबे.
५० मीटर बॅकस्ट्रोक (९ वर्षांखालील मुले) : १. विहान मंत्री, २. पार्थ रोंगे, ३. तनय लोढा. ५० मीटर बॅकस्ट्रोक (९ वर्षांखालील मुली) : १. जिजाई जाधव, २. परिणीती घाटेशाही, ३. शताक्षी पवार.
२०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (१४ वर्षांखालील मुले) : १. ईशान तिडके, २. आरूष जाधव, ३. उदयन देशमुख. २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (१४ वर्षांखालील मुली) : १. झील मालानी, २. अद्विती सावंत, ३. शिवानी कुऱ्हाडे.
२०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (१७ वर्षांखालील मुले) : १. आयुष गायकवाड, २. संकेत जोशी, ३. शिवतेज रत्नपारखी. २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (१७ वर्षांखालील मुली) : १. मैथिली चिटणीस, २. सुहानी ओसवाल, ३. मलिष्का देवकुळे.
५० मीटर बटरफ्लाय (१४ वर्षांखालील मुले) : १. अनय पाध्ये, २. निरंजन यादव, ३. विहान सराफ. ५० मीटर बटरफ्लाय (१४ वर्षांखालील मुली) : १. दक्षिता दुबे, २. झील मालानी, ३. अमोली नेर्लेकर.
५० मीटर बटरफ्लाय (१७ वर्षांखालील मुले) : १. वेदांत तांदळे, २. आयुष पांडे, ३. तन्मय राजापूरे. ५० मीटर बटरफ्लाय (१७ वर्षांखालील मुली) : १. दीप्ती टिळक, २. साराक्षी दांगट, ३. सई कामत.
४०० मीटर मिड रिले (१४ वर्षांखालील मुले) : १. ईशान तिडके, २. अनय पाध्ये, ३. हर्षल हजारिका. ४०० मीटर मिड रिले (१४ वर्षांखालील मुली) : १. काव्या रिसबूड, २. अनुष्का विजापूर, ३. शैली बेहेरे.
४०० मीटर मिड रिले (१७ वर्षांखालील मुले) : १. शाल्व मुळ्ये, २. चैतन्य शिंदे, ३. सोहम वाळके. ४०० मीटर मिड रिले (१७ वर्षांखालील मुली) : १. त्विशा दीक्षित, २. मैथिली चिटणीस, ३. धन्यता ओसवाल.
४०० मीटर मिड रिले (वरिष्ठ मुली) : १. त्विशा दीक्षित, २. दिव्या मारणे.
८०० मीटर फ्री स्टाईल (१४ वर्षांखालील मुली) : १. कैजा शंकर, २. मिनरेवा पती, ३. अनुष्का विजापूर.