धाराशिव : महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने मुंबई आणि पुणे येथे आयोजित वरिष्ठ महिला/पुरुष गट स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे २४ मे रोजी सकाळी ८.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणीत १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ५००० मीटर,१०००० मीटर, ३००० मीटर स्टीपलचेस, लांब उडी, उंच उडी, बांबू उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, हातोडा फेक, ४ बाय १०० मीटर रिले, ४ बाय ४०० मीटर रिले व २० किमी चालणे इत्यादी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमधून विजयी खेळाडूंची निवड धाराशिव जिल्हा संघात केली जाणार आहे.
खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, जन्म दाखला (नगरपालिका/ग्रामपंचायत), २ पासपोर्ट साइज फोटो, दहावी प्रमाणपत्र, एएफआय यूआयडी सोबत आणावे. यासाठी सुरेंद्र वाले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून मुनीर शेख, ज्ञानेश्वर भुतेकर, अजिंक्य वराळे यांची तर राजेश बिलकुले यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सदस्य म्हणून सचिन पाटील, रोहित सुरवसे, प्रशांत बोराडे, ऋषिकेश काळे, अश्विन पवार हे आहेत.
स्पर्धा प्रमुख म्हणून राजेंद्र सोलनकर यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा भरत जगताप आणि सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी योगेश थोरबोले (9860609056), माऊली भुतेकर(9404193674), रोहित सुरवसे (7796756866) यांच्याशी संपर्क साधावा.