
हिंगोली ः हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते १६ मे या कालावधीत क्रीडा प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचा समारोप शुक्रवारी झाला.
कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शिबिराचा समारोप झाला. या प्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख राम भाऊ कदम तसेच हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी बोथीकर, क्रीडा अधिकारी कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण, क्रीडा कार्यालयाचे लिपिक खुणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बंकट यादव, ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना आमदार संतोष बांगर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी या शिबिरातील १५ दिवस हे खूप छान वातावरणात घालवले. त्यात विद्यार्थ्यांना एक दिवस पर्यटन करून आणण्यात आले. तसेच एक पेड मा के नाम हा उपक्रम हाती घेऊन मैदानावर झाडे लावण्यात आली. नैसर्गिक आहाराचे धडे सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आले. स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी खेळाच्या मैदानावरच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले आठवी ज्योतिर्लिंग येथे सुद्धा स्वच्छता करून उन्हाळी जिल्हा प्रशिक्षण शिबिराचा नावलौकिक वाढवला.
एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव आणि एनआयएस प्रशिक्षक गजानन आडे यांचा मोलाचा वाटा या शिबिराच्या यशस्वी आयोजनात आहे. त्यांच्यासोबत हा कॅम्प यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकता युवा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सहकारी प्रकाश अडकिने, रहीम कुरेशी, शंकर पोघे, विशाल कदम, दीपाली आडे, समृद्धी कदम, बजरंग कदम, करण भिसे, लक्ष्मण राठोड, नागेश ढोकर, वंश कोंढाणे या सर्व प्रशिक्षकाचे विशेष सहकार्य लाभले.