छत्रपती संभाजीनगर ः रग्बी फुटबॉल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रग्बी स्पर्धा रविवारी (१८ मे) आणि जिल्हा निवड चाचणी पीईएस कॉलेज मैदानावर आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव श्याम अंभोरे यांनी दिली.
पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी या निवड चाचणीतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. ही निवड चाचणी स्पर्धा सब ज्युनिअर मुले-मुली, ज्युनिअर मुली, ज्युनिअर मुले अशा वयोगटात घेण्यात येणार आहे.
या वयोगटात राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेचे आयोजन रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व पुणे जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी करण्यात आले आहे,
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा व महाविद्यालयातील खेळाडूंनी निवड चाचणीमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ शिवाजी सूर्यवंशी, क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, मोहित देशपांडे, अनिकेत निलावार, प्रा कैलास जाधव, रामेश्वर चायल यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा संघटनेचे सचिव श्याम अंभोरे, अभिषेक देशमाने, अजिंक्य लोळगे मनोज चव्हाण, वैशाली चव्हाण, दीप्ती सोनवणे, अथवा 9923249173 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सचिव श्याम अंभोरे यांनी केले आहे.