
फुटसाल म्हणजे स्पेश मॅनेजमेंट ः आमदार राहुल ढिकले
नाशिक ः राम भूमी बहुउद्देशीय मंडळ नाशिक व फुटसाल असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या पूर्व मतदार संघातील आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष सहकार्याने जिल्हास्तरीय फुटसाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सिक्रेट हार्ट आणि आर्यन स्पोर्ट्स क्लब या संघांनी आपल्या गटात विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या आयोजनामुळे खेळाडूंमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी मविप्रचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम, उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचे सरचिटणीस दीपक निकम, शिवा फ्रेंड सर्कल संस्थापक सोमनाथ वडजे, राजू थोरात, माजी नगरसेवक उल्हास धनवटे यांचे समवेत अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी खेळाडूंना संबोधित करताना डॉक्टर सुनील ढिकले यांनी फुटसाल हा अतिशय कमी जागेत खेळला जाणारा फुटबॉल प्रकार आहे आणि फुटबॉल खेळत असताना खेळाडू आणि फुटबॉलचा स्पीड यावर संतुलन राखणे त्याचबरोबर कमी जागेत फुटबॉल हाताळणे आणि गोल पोस्टपर्यंत नेणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे एवढ्या कमी जागेत खेळ खेळत असताना तो आपल्या खेळाडूकडे बरोबर पास करणे गोल करण्याचे प्लॅनिंग करणे हे अतिशय कठीण काम आहे. त्यामुळे फुटसाल खेळणारा खेळाडू हा कायम स्पेस मॅनेजमेंट आणि प्लेस मॅनेजमेंट मध्ये हुशार असतो असे त्यांनी प्रतिपादन केले.
स्पर्धा दोन दिवस उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली. पारितोषिक वितरण समारंभासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ क्रीडा विभाग जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, फुटसाल असोसिएशन ऑफ नाशिकचे सरचिटणीस दीपक निकम, अविनाश वाघ, अखिल भारतीय मराठा महासंघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्षांखालील गट ः प्रथम : सिक्रेट हार्ट, द्वितीय : रायन इंग्लिश स्कूल, तृतीय : मीगे ११ फुटबॉल क्लब.
१७ वर्षांखालील गट ः प्रथम : आर्यन स्पोर्ट्स क्लब, मालेगाव, द्वितीय : रायन इंग्लिश स्कूल, तृतीय : फायटर स्पोर्ट्स अकॅडमी, येवला.