ईशानला पाच सुवर्णपदके, झील, साराक्षीला दुहेरी मुकुट

  • By admin
  • May 18, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

दामले स्मृती पुणे जिल्हा जलतरण स्पर्धा 

पुणे : पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या वतीने रमेश दामले मेमोरियल पुणे जिल्हा जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या दिवशी ईशान तिडके, झील मालानी, साराक्षी दांगट यांनी दुहेरी मुकुट संपादन केला.

डेक्कन जिमखाना टिळक तलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १७ वर्षांखालील मुलींच्या गटात साराक्षी दांगटने ०१.१२.१६ सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, अन्वी विश्नोई (०१.१३.७५ से) हिने दुसरा आणि अनुष्का चौडा (०१.२१.३२ से) हिने तिसरा क्रमांक पटकावला.


१०० मीटर बटरफ्लायमध्ये वरिष्ठ मुलींच्या गटात साराक्षी दांगटने ०१.१२.१६ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.

५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गटात झील मालानी हिने ००.३६.२२ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले. याच वरिष्ठ मुलींच्या गटात झील मालानी हिने ००.३६.४७ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाचा मान पटकावला.

२०० मीटर मिडले प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ईशान तिडके याने ०२.३८.७५ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाला गवसणी घातली. १५०० मीटर फ्री स्टाईल मध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ईशान तिडके याने १९.४३.१९ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.

अंतिम निकाल

५० मीटर फ्री स्टाईल (६ वर्षांखालील मुले) : १. युवराज तिडके, २. युवान सुपेकर, ३. अथर्व सिंग. ५० मीटर फ्री स्टाईल (६ वर्षांखालील मुली) : १. मीरा गोखले, २. काशवी पाटणकर, ३. आरोही खिंवसरा.

५० मीटर फ्री स्टाईल (७ वर्षांखालील मुले) : १. निमिष करडे, २. अद्वैत चाकणकर, ३. विवान पडवळ. ५० मीटर फ्री स्टाईल (७ वर्षांखालील मुली) : १. अवनी यादव, २. काव्या वाघमारे, ३. काव्या साने. 

५० मीटर फ्री स्टाईल (८ वर्षांखालील मुले) : १. तारुष देशपांडे, २. अर्जुन कुरुडकर, ३. विराज पाटील. ५० मीटर फ्री स्टाईल (८ वर्षांखालील मुली) : १. परिणया घाडगे, २. प्रिशा बनसोड, ३. इरा चोबे.

५० मीटर फ्री स्टाईल (९ वर्षांखालील मुले) : १. पार्थ रोंगे, २. शिवांशू खोराटे, ३. विहान मंत्री. ५० मीटर फ्री स्टाईल (९ वर्षांखालील मुली) : १. तनुष्का आर, २. परिणीती घाटेशाही, ३. अंजली वाघमारे.

५० मीटर फ्री स्टाईल (१० वर्षांखालील मुले) : १. सत्यजित मोहिते, २. मैत्रेय तांबवेकर, ३. सिद्धांत चेळेकर. ५० मीटर फ्री स्टाईल (१० वर्षांखालील मुली) : १. अमया वैद्य, २. त्रिशा सकपाळ, ३. वैदेही झवर.

१०० मीटर बटरफ्लाय (१४ वर्षांखालील मुले) :१. अनय पाध्ये, २. विहान सराफ), ३. शौनक खाडिलकर. १०० मीटर बटरफ्लाय (१४ वर्षांखालील मुली) :१. दक्षिता दुबे, २. अमोली नेर्लेकर, ३. शैली बेहेरे.

१०० मीटर बटरफ्लाय (१७ वर्षांखालील मुले) :१. वेदांत तांदळे, २. शाल्व मुळ्ये, ३. वरद कदम. १०० मीटर बटरफ्लाय (१७ वर्षांखालील मुली) :१. साराक्षी दांगट, २. अन्वी विश्नोई, ३. अनुष्का चौडा.

१०० मीटर बटरफ्लाय (वरिष्ठ खुला मुले) :१. सलील भागवत, २. वेदांत तांदळे, ३. अर्णव भाडेकर. १०० मीटर बटरफ्लाय (वरिष्ठ मुली) : १. साराक्षी दांगट, २. अमोली नेर्लेकर, ३. श्रुती गोडसे.

५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (१४ वर्षांखालील मुले) : १. उदयन देशमुख, २. केदार घाग, ३. नील पंडित. ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (१४ वर्षांखालील मुली) : १. झील मालानी, २. तनया यादव, ३. अद्विती सावंत.

५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (वरिष्ठ खुला मुले) : १. वरुण चव्हाण, २. आयुष गायकवाड, ३. दिग्विजय वांजळे. ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (वरिष्ठ खुला मुली) : १. झील मालानी, २. समृद्धी जाधव, ३. सई कामत.

२०० मीटर मिडले (१४ वर्षांखालील मुले) : १. ईशान तिडके, २. केदार घाग, ३. रुद्र वाडकर. २०० मीटर मिडले (१२ वर्षांखालील मुली) : १. अनिशा काळे, २. अद्विका सोनी, ३. वृंदा वाणी.

२०० मीटर मिडले (१२ वर्षांखालील मुले) : १. वेद नातू, २. अनय गुप्ता, ३. रुद्र गुप्ता.

१५०० मीटर फ्री स्टाईल (१४ वर्षांखालील मुले) : १. ईशान तिडके, २. शार्दुल लाटे, ३. हर्षल हजारिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *