
नाशिक : नाशिक येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूल या विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये सेंट फ्रान्सिस हायस्कूल, तिडके कॉलनी या शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांनी या बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले. मिलिंद कार्तिक इखे याने ९५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. प्रियंका भगवान भडांगे आणि काव्या प्रकाश अहिरे या दोघींनी ९४.४० टक्के गुण मिळवत संयुक्त दुसरा क्रमांक प्राप्त केला. सेजल योगेश्वर पाटील हिने ९३.४० टक्के गुण मिळवत तर तृतीय क्रमांक मिळविला. सतरा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार १५ मे रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला.
यात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, पर्यवेक्षिका गुरमीत शेटे यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्व यशाच्या शिल्पकारांचे अभिनंदन शाळेचे चेअरमन डॉ ए एफ पिंटो, डायरेक्टर ग्रेस पिंटो, मुख्याध्यापक संजय पाटील, पर्यवेक्षिका गुरमीत शेटे आणि इतर सर्व शिक्षक वृंद यांनी केले.